महाराष्ट्र मध्ये अनेक नियोजित महामार्ग असून या माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये मार्गांचे जाळे विकसित करण्यावर भर देण्यात येत असून या माध्यमातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि इतर राज्यातील शहरे महाराष्ट्राचे शहरांना जोडण्यासाठी या महामार्गांचे महत्व अनन्यसाधारण असे आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाचा विचार केला तर हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वकांक्षी आणि महत्त्वाचा प्रकल्प असून यामुळे पुणे ते नाशिक हे अंतर तीन तासांमध्ये पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर या दृतगती महामार्गाच्या माध्यमातून राजगुरुनगर व चाकण मार्गे थेट शिर्डीला देखील जाता येणे आता प्रवाशांना शक्य होणार आहे.
लवकर हा औद्योगिक महामार्ग पूर्ण होईल अशी शक्यता आहे. या महामार्गाचा प्रस्ताव हा 2023 मध्ये एमएसआरडीसीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला होता. तसेच या महामार्गाचा आराखडा देखील तयार असून तो पीडब्ल्यूडी विभागासमोर सादर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे.
पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास होणार सोपा
जर आपण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा विचार केला तर संपूर्ण राज्यांमध्ये जवळपास चार हजार किलोमीटर पेक्षा जास्त महामार्गाचे जाळे विकसित करण्यात येत असून यामध्येच पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्गाचा समावेश आहे.
साधारणपणे हा महामार्ग 213 किलोमीटर लांब असणारा असून महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होणारे शहर नाशिक यामधील प्रवास करण्याचा कालावधी हा तब्बल पाच तासांचा होता.
परंतु हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तीन तासात हे अंतर पूर्ण करता येणार आहे. पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्गासाठी साधारणपणे 20000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुणे ते राजगुरूनगर व मंचरमार्गे थेट नगरला जाता येणार
पुण्यावरून राजगुरुनगर, चाकण आणि मंचर वरून हा महामार्ग थेट नाशिकला जाणार आहे. त्यामुळे पुण्यासहित अहमदनगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यांचा औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे.
पुण्यामध्ये असलेल्या आयटी कंपनी आणि नाशिक मधील एमआयडीसी क्षेत्राला यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे. तसेच या द्रुतगती महामार्गामुळे पुणे आणि नाशिक सोबतच मुंबई देखील जोडली जाणार आहे.
कसा राहील या महामार्गाचा रूट?
पुणे-नाशिक प्रस्तावित महामार्ग हा राजगुरुनगर, चाकण, मंचर तसेच नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर मार्गे थेट शिर्डी या महत्वाच्या तीर्थक्षेत्राकडे देखील जाता येणे शक्य होणार आहे. कनेक्ट केला जाणार आहे व यातील पहिला टप्प्यात पुणे ते शिर्डी 135 किलोमीटरचे अंतर व शिर्डी इंटरचेंज ते नाशिक निफाड इंटरचेंज हे 60 किलोमीटर पर्यंत
दुसरा टप्पा असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा दुसरा टप्पा सुरत ते चेन्नई एक्सप्रेस वेळेला जोडला जाणार आहे. तसेच याचा तिसरा टप्पा हा साठ किलोमीटरचा असणार आहे. त्यामुळे या महामार्गामुळे नक्कीच औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला फार मोठा फायदा होईल याबाबत शंकाच नाही.