अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह कोरोना योद्धा देखील या महामारीच्या विळख्यातून सुटलेले नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वीच राहुरी कारागृहातील 37 कैदी कोरोनाबाधित आढळले होते. या घटनेने एकच खळबळ माजली होती. मात्र आता कैद्यांपाठोपाठ तब्बल आठ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने,
आता पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सात- आठ पोलिस आजारी असूनही कामावर आहेत. त्यामुळे, एखाद्या पोलिस कर्मचार्याच्या जीवावर बेतण्याची व कोरोना संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी गरज असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या निष्क्रिय कारभाराचा फटका सर्वच घटकांना बसत आहे.
कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले. परंतु, सर्व अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची पुन्हा कोरोना तपासणी करण्यात आली नाही. ज्यांना त्रास होतो.
ते स्वतःकोरोना तपासणी करुन घेऊ लागले. तपासणीमध्ये राहुरी पोलिस ठाण्यातील आठ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचार घेत आहेत. सात-आठ कर्मचारी आजारी आहेत.
परंतु, कामाच्या व्यापामुळे त्यांनी कोरोना तपासणी केली नाही. अशीच परिस्थिती राहिली. तर, भविष्यात एखाद्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची भीती पोलिस वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची कोरोना तपासणी होण्याची गरज व्यक्त होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved