अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले.
मृत्यूमध्ये परतीने जाणारे नववधूचा समावेश आहे. तर नवरदेव जखमी झाला आहे. तर अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जारीकोट ता. धर्माबाद येथील नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचे साखरा ता. उमरखेड येथील पूजा तामलवाड यांच्याशी साखरा ता. उमरखेड येथे १९ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते.
त्यानंतर आज २१ रोजी मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकरमार्गे मॅजिक वाहनाने जाताना भोकर तालुक्यातील सोमठाणा पाटीजवळ सायंकाळी ६ वाजता समोरुन येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली.
या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवाड (वय २० वर्ष, रा. साखरा ता. उमरखेड), माधव पुरभाजी सोपेवाड (वय ३०, रा. जामगाव ता. उमरी),
दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (वय २२ रा. साखरा), सुनील दिगंबर थोटे (वय ३० रा. चालगणी ता. उमरखेड) यांच्यासह अन्य एक (नाव समजु शकले नाही) अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला.
गंभीर जखमीमध्ये नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांच्यासह सुनीता अविनाश टोकलवार (वय ४० वर्ष, रा उमरी जहागीर, ता. हदगाव),
गौरी माधव चोपलवाड (वय दीड वर्ष रा. उमरी जहागीर ता. हदगाव ) अविनाश संतोष टोकलवार (वय ३६ वर्षे, रा. उमरी जहागीर, ता. हदगाव), अभिनंदन मधुकर कसबे (वय १२ रा.वाजेगाव) यांच्यासह ६ जणांचा समावेश आहे.