अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.
तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा (Support) दिला आहे. दरम्यान, तीनपैकी एकही कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही.
महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत,
असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. नागपुरात मी सेंद्रीय शेती करतो, माझी पत्नी ते सगळं काम पाहते. नागपूर येथील प्रताप नगर येथे तो भाजीपाला विकला जातो.
तिथे शेतीतल्या उत्पादनांना चांगला भाव मिळतो. मला बाजार समितीत जाण्याची गरज नाही. जर कायदा झाला नसता तर हे घडलं असतं का? तीनपैकी एकही कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही.
मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.