अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 6 डिसेंबर 2020 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैतन्यभूमी, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात तसेच मोठया शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात असेलेले सर्व धर्मिय सण/ उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्यामुळे या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर पुर्ण खबरदारी घेवुन अत्यंत साध्या पध्दतीने पार पाडण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोविड विषाणुच्या पार्श्वभूमिवर चैत्यभुमी, दादर येथे येण्यावर निर्बध असल्याने व दादर तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने राज्य शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे न येता घरातुनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांर्भिर्याने पालन करावयाचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोविड संसर्गाचा विचार करता महापरिनिर्वाण दिन सर्व अनुयायांनी विचारपुर्वक व धैर्याने वागावे. तसेच घरी राहूनच परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची सर्व अनुयायांना विनंती करावी, अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे,
तालुके यामध्ये आयोजित करण्यात येत असल्याने महापरिनिर्वाण दिनी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved