गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टिकेवर शरद पवार म्हणाले “मला बोलायचं आहे, पण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं म्हटलं होत आज पडळकर यांनी केलेल्या टिकेवर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

आज पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला शरद पवार यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पत्रकारांनी गोपीचंद पडळकरांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे.

दरम्यान या बैठकीनंतर शरद पवार यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी सेंटरमधील कोविड सेंटरला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी डॅशबोर्ड प्रणालीचीदेखील माहिती घेतली.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ हेदेखील उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे. गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले.

गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना” अशी शंका ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24