जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-अनेकदा किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत होते व नकळत टोकाचे पाऊल उचलले जात असल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील.

अशाच जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहात्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील दोन तरूण रविवारी राहाता येथे आले होते.

त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना रात्री 8 ते 11 वाजेच्या दरम्यान राहाता न्यायालयाजवळ घडली. या मारहाणीत राहुल जेजुरकर हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर या मारहाणीच्या घटनेत शाम जेजुरकर हा तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर शिर्डीच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. जेजूरकर आणी राहाता येथे राहणारा प्रविण बनकर यांचे जुने काहीतरी वाद होते.

हे वाद आपण समोपचाराने मिटवून घेऊ असं सांगून या दोघांना बोलवण्यात आलं आणी बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती जखमी तरूणाने दिली आहे. दरम्यान शिर्डी आणी राहाता पोलीसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

मयत राहुल जेजूरकर याचे पोस्टमार्टम केले जाणार असून डाॅक्टरांचा रिपोर्ट आणि जखमी तरूणाच्या फिर्यादीवरून दोषींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24