Pikvima News : एक रूपयात पीक विम्यासाठी होतोय शंभर रूपये खर्च

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pikvima News : मागील वर्षीचा पीक विमा मंजुरी बाबत शासनाने केवायसी अपडेट करण्याचे आदेश दिल्यानंतर हे केवायसी मोफत अपडेट करण्याच्या सूचना नगर तालुका तहसीलदार यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गाव गावांमध्ये सेतु चालकांकडून व दुसऱ्या सेतू कार्यालयाचा आईडी वापरून हजारो रुपये उकळत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे.

ज्या गावांमध्ये सेतू कार्यालय नाही अशा ठिकाणी खाजगी एजंटांकडून केवायसी अपडेट करून देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. केवायसी अपडेट करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपये उकळे जात असल्याची चर्चा आहे. मात्र परत अडचण नको म्हणून कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही.

नगर तालुक्यात यापूर्वीही अनेक सेतू कार्यालयाकडून शासनाच्या नियमा व्यतिरिक्त रक्कम उकळण्याचे प्रकार घडले असून अद्यापही ते सुरू आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा रेशन बाबत कुठल्याही तक्रारी किंवा दुरुस्तीसाठी नागरिकांना दोन ते तीन वेळा बोलावून प्रत्येक वेळी पैशाची मागणी केली जाते.

अनेकदा नागरिकांना एका कामासाठी तीन ते चार वेळेस सेतु कार्यालय चालक बोलावून रकमेची मागणी करतात. मात्र एका कामासाठी एकाच वेळी शासकीय फी असतानाही नागरिकांची लूट होताना दिसून येते.

याबाबत तलाठी अधिकाऱ्यांनी सेतू कार्यालयांना योग्य त्या सूचना देणे आवश्यक असतानाही, तलाठी नेमून दिलेल्या सजेच्या ठिकाणावरून गायब झाल्याचे चित्र नगर तालुक्यात पहावयास मिळते. शासकीय अधिकारी सजेच्या ठिकाणी राहने गरजेचे असतानाही या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच आहे.

लेखी तक्रार दिल्यास कार्यवाही : तहसीलदार दरम्यान याबाबत पीक विम्यासाठी लागणारी कागदपत्र अपडेट करण्यासाठी शेतकऱ्यांची लूट केल्याबाबत तहसीलदारांना अवगत केले असता.

नगर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडून केवायसी बाबत पैसे उकळण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांनी तक्रार करावी. संबंधित सेतू चालकावर तात्काळ कारवाई केली जाईल असे तहसीलदारांनी सांगितले