अहमदनगर मध्ये कांदा कोसळला ! प्रचंड घसरण झाल्याने झाले मिळाले ‘असे’ दर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याची आवक वाढल्याने काही दिवसांपूर्वी वधारलेल्या कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली असून, कांदा २० ते २४ रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा तेवढ्याच वेगाने आता कोसळत आहे. 

मागील एक महिन्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची कमी अधिक स्वरूपात आवक असल्याने कांद्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता व दर ३० ते ४० रुपयांपर्यंत स्थिरावलेले असायचे. 

मात्र चार दिवसांपूर्वी आवक कमी झाल्याने कांद्याच्या दराने किंचीत उसळी घेतली होती. ही दरवाढ लक्षात घेता दोन दिवसांपासून आवक वाढू लागली.  शनिवारी ३२ हजार ५२२ क्विंटल कांद्याची आवक बाजारात झाली. 

त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने मालाचा उठाव कमी झाला. परिणामी कांद्याच्या दरात घसरण झाली असून आता एक नंबरचा कांदा २० ते २५ रूपये, दोन नंबरचा कांदा १५ ते २० रूपये, तिन नंबरचा कांदा ९०० ते १५०० रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. 

मागील काही दिवसांपासून कांद्याला मिळत असलेले उच्चांकी दर पाहता पुढे हे दर असेच टिकुन राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आजच्या लिलावात कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने आता चांगले दर मिळण्याच्या आशेवर मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केलेल्या अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

 

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24