पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला क्विंटलमागे आजवरचा उच्चांकी ८३०० रुपये इतका दर मिळाला.

परतीच्या पावसानंतर कांद्याचे दर कडाडले असून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये रोजच कांद्याच्या दराचे उच्चांक मोडले जात आहेत.

कांदा दर वाढल्यामुळे घरगुती ग्राहक व हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) झालेल्या कांदा लिलावात जुन्या व चांगल्या प्रतीच्या कांद्याला ४२०० ते ८३०० रुपये दर मिळाला.

त्यानंतर मध्यम प्रतीच्या कांद्याला २५०० ते ३५०० तर सर्वात कमी प्रतीच्या कांद्याला ८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पारनेर बाजार समितीत शुक्रवारी ८१९ कांदा गोण्यांची आवक झाली.

शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदाही संपल्यामुळे आवक घटली आहे. कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याला अत्यल्प दर मिळतो. लिलावात फेकून देण्याइतपत कमी दर्जाच्या कांद्यालाही चांगला दर मिळाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24