खचलेल्या विहिरीत सांडला कांदा; या तालुक्यात घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यातच नेवासा तालुक्यात एका शेतकऱ्याची विहीर खचली असल्याने यामध्ये कांदा कोसळला असल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी,

नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरी कचरू खंडेराव कर्जुले यांच्या मालकीची दगडी बांधकाम केलेली जुनी विहीर आहे.

या विहिरीजवळच त्यांनी कांदा साठवण केलेली कांदा चाळ आहे. जादा पाऊस झाल्याने विहीर व परिसरात अधिक प्रमाणात पावसाचे पाणी साचून विहीर खचत गेली.

शेजारी असलेली कांदाचाळ पडून चाळीतील तीस ते चाळीस गोण्या कांदा विहिरीत गडप झाला. शेजारील शौचालय व बाथरुमही विहिरीत पडले.

त्याचबरोबर राहते घरही ढासाळण्याच्या मार्गावर आहे. ऐन सणासुदीत या शेतकर्‍यावर मोठी आपत्ती कोसळली आहे. अतिवृष्टीचे पीक पंचनामे झाले.

मात्र अतिवृष्टीमुळे या शेतकर्‍यावर कोसळलेल्या आपत्तीची नुकसान भरपाई मिळून त्याला काही दिलासा मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24