दररोज फक्त ‘इतक्या’ भाविकांना घेता येणार शनिदर्शन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे शनिशिंगणापूर येथील शनिदेवाचे शनिदर्शन गेले आठ महिने बंद होते .राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर

सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबवत सोमवारपासून शनिमंदिर भाविकांसाठी खुले झाले. विश्वस्त व अधिकारी यांनी सुयोग्य नियोजन केले. दररोज ६००० भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी भक्तांना हात पाय धुवून, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे व मास्क बांधणे अनिवार्य आहे.

मूर्तीपर्यंत पूजा साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त तेल नेता येणार आहे. मंदिर खुले झाल्याने अनेक महिन्यापासून बंद असलेले दुकानाची व्यसवसायिकांनी उघडून साफसफाई केली.

व्यवसाय सुरू झाल्याने व्यावसायिकांनी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. अनेक महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने अर्थचक्र बंद पडले होते.

मंदिर सुरू झाल्याने सर्व व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यावसायिक रामकिसन ढगे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24