शेतकरी कायद्याला विरोध: नगर नाशिक किसान रॅली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- भाजप प्रणित केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकरी आणि सामान्यांनी आता संघटित व्हावे. असे आवाहन विधानपरिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले.

केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा असल्याचा ठपका आ.तांबे यांनी ठेवला.  जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर ते नाशिक किसान रॅली आयोजित करण्यात आली होती.

या रॅलीचा सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हा अध्यक्ष सुरेश झावरे, आ.लहू कानडे, पगडाल सर, शहर जिल्हाध्यक्ष मनोज लोंढे, बाबा खरात, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश सदस्य शामराव वघसकर,

नगर शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, शारदा वाघमारे, दिलीप बागल, रिजवान शेख, किरण आळकुठे, नीता बडे, मीना घाडगे, खलील सय्यद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार तांबे पुढे म्हणाले की, गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे पण भाजप सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही,

लोकांची दिशाभूल करणे आणि आंदोलन मोडून काढणे असा त्यांचा प्रयत्न असून, आम्ही त्यांचा प्रयत्न सफल होऊ देणार नाही. दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ही रॅली पक्षाच्या वतीने काढण्यात आली आहे.

आ.कानडे, खरात ,पगडाल, जिल्हा अध्यक्ष झावरे, प्रदेशाध्यक्ष अवताडे यांचे रॅलीच्या ठिकाणी भाषणे झाली व आमदार तांबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24