अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असे आठवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील एक पक्ष काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करताना नामांतराला विरोध केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये नामांतरासाठी मतभेद असल्याने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष भाजपने नामांतराची मागणी रेटून धरली आहे. तसेच, शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
आठवले हे सध्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असून भाजपचा ‘संभाजीनगर’ला पाठिंबा असताना आठवले यांनी घेतलेली विरोधी भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणाऱ्या मनसेनेही नामांतराच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.