मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहा’ चे आयोजन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदच्यावतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे 11 ते 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी दिली.

या सप्ताहाचा शुभारंभ बुधवार दि.11 रोजी स.11 वा. रामचंद्र खुंट, किंग्जगेट येथे अल-करम मॅटेरनिटी हॉस्पिटल येथे अभिवादन करुन आरोग्य शिबीराने करण्यात येणार आहे.

या सप्ताहामध्ये ऑनलाईन व्याख्यान, वृक्षारोपण, मोफत नेत्र शिबीर, साहित्यिक विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सोसायटीचे सचिव डॉ.कमर सुरुर यांनी सांगितले.

सप्ताह यशस्वीतेसाठी अल-करम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटी, मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी, फिनिक्स फौंडेशन,

अहमदनगर सोशल फौंडेशन ट्रस्ट, मुस्कान वेलफेअर असोसिएशन, जीवन फौंडेशन, रहेमत सुलतान फौंडेशन आदिंचे सहकार्य मिळणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24