Maharashtra News : सुमारे ७० वर्षाचा आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आतापर्यंत ३२ लाख नोंदी सापडल्या असून त्याच्या आधारे सुमारे पावणेदोन कोटी मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. अजून नोंदी पहाण्याचे काम सुरुच आहे.
आरक्षणावर आमच्या मुलांचे भवितव्य अवलंबून आहे. गायकवाड कमिशनने मराठ्यांना १२ ते १३ टक्के मागास घोषित केले होते. परंतु तरीही मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही. सुमारे ७० वर्षापासून या नोंदी दडपून ठेवण्याचे पाप कुणी केले, हे लवकरच जनतेसमोर येणार आहे.
शांततेत आंदोलन करा, कुठेही हिंसा करु नका, आपल्या आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. त्यामुळे त्यांच्याकडून जातीय दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहे.
आपली एकजूट ठेवा, काही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, मराठा समाजाच्या पदरामध्ये आरक्षण टाकल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
श्रीरामपूर सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी सायंकाळी येथील थत्ते मैदानावर आयोजित महाविराट सभेत ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होता.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाची लढाई आपण ८५ टक्के जिंकलो आहे. आता लढाई अंतिम टप्यात आली आहे. या काळात कुठेही मराठा ओबीसी वाद होता. कामा नये, आता गाफील राहू नका, आरक्षण मिळेपर्यंत कुणाचेही झेंडे हातामध्ये घेऊ नका,
आजपर्यंत त्यांचेच झेंडे आपण हातामध्ये घेतले त्यांनी आपल्यासाठी काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या शांततेच्या आंदोलनामुळेच शासनाच्या वतीने सन १८०५ ते १९६७ आणि १९६७ ते २०२३ पर्यंतच्या नोंदी पहाण्याची मोहीम सुरू झाली आहे.