श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  आयोध्‍येमध्‍ये प्रभू श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्वाखाली राम मंदिराच्‍या निर्माणाचे कार्य हे देशाच्‍या अध्‍यात्मिक, सांस्‍कृतीक आणि एकात्मिक परंपरेचा सर्वोच्‍च मानबिंदू ठरेल अशा शब्‍दात भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपला आनंद व्दिगुणीत केला. 

लोणी बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयात आ.विखे पाटील यांनी आयोध्‍येतील राम मंदिर भूमिपुजनाचा सोहळा दुरचित्रवाहीणीवरुन ग्रामस्‍थांसमवेत पाहीला. भूमिपुजनाचा मुहर्त साधुन ग्रामस्‍थांनी प्रभू श्रीरामचंद्राच्‍या प्रतिमेचे पुजन करुन आरती केली.

याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्‍य अनिल विखे, किसनराव विखे, सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, सुभाषराव विखे, वसंतराव विखे, आण्‍णासाहेब म्‍हस्‍के, संपतराव विखे, भाऊसाहेब विखे, शंकर विखे, भारत महाराज धावणे, परशुराम विखे, आदिंसह ग्रामस्‍थ उपस्थित होते.

प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोष करीत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्‍यक्‍त केला. याप्रसंगी बोलताना आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर आयोध्‍येत साकार होणे हा राष्‍ट्रीय अस्मितेचा विषय होता. प्रत्‍येक देशवासियाच्‍या भावना या विषयाशी समर्पित झालेल्‍या होत्‍या.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राम मंदिराचा विषय सर्व मर्यादांचे पालन करुन यशस्‍वीपणे सोडविला याबद्दल पंतप्रधान आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अभिनंदन करुन त्‍यांनी सांगितले की, देशाचा जातीय आणि धार्मिक सलोखा आबाधित राखुन मंदिर निर्माणाचे सुरु झालेले काम हे देशाच्‍या अध्‍यात्मिक दृष्‍टीने महत्‍वाचे आहेच परंतू सांस्‍कृतीक आणि एकात्मिक परंपरेचा सर्वोच्‍च मानबिंदू ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24