अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- जगभरात कोरोना रोगाने हाहाकार उडाला. त्यानंतर सध्या कोंबड्याना होणाऱ्या बर्ड फ्लू आजाराने थैमान घातले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश , हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, गुजरात या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू या साथीचा फैलाव झाला आहे.
ही साथ महाराष्ट्र सह आणखी कोणत्याही राज्यांमध्ये पसरू नये यासाठी अतिशय दक्षता घेण्यात येत आहे. अजून बर्ड फ्लू चा महाराष्ट्र मध्ये शिरकाव झाला नाही आहे.
कोणत्याही दुसऱ्या राज्यांमध्ये बर्ड फ्लू चा फैलाव होऊ नये यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन खात्याने प्रत्येक ठिकाणी पाहणी सुरु केली आहे आणि सर्व राज्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली मध्ये कोंबड्या या अन्य पाळीव पक्षी आण्यास दिल्ली सरकारने तात्पुरती बंदी घातली आहे. देशभर कोरोना च्या साथीने पहिलेच थैमान घातले आहे.
कोरोना सोबत च बर्ड फ्लू ची त्या मध्ये भर पडल्यामुळे आरोग्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. सगळ्यां राज्यांच्या आरोग्य व पशु संवर्धन यंत्रणा आता सज्य झाल्या आहेत.
कुठे हि पक्षी मरण पावल्याची घटना घडल्यावर तातडीने पशु संवर्धन पथक त्याची त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहे. घटना स्थळी जाऊन सर्व प्रकारच्या तपासण्या देखील केल्या जात आहे.