ओव्हरफ्लो पाण्याचा उच्चांक; ‘मुळा’तून जायकवाडीला ‘इतके’ पाणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणा पूर्ण भरलेले असून मुळातून जायकवाडीला साडेबारा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

1 हजार क्युसेसने जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरूच आहे. यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो पाण्याचा उच्चांक होऊन जायकवाडी धरणाला 12 हजार 576 दलघफूट पाणी देण्यात आले.

ओव्हरफ्लोचे एकूण 16 हजार दलघफू पाणी धरणातून सोडण्यात आल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखाभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.

तीन-चार दिवसांपासून मुळा धरणाच्या बॅकवाटर पटट्यामध्ये पावसाने थांबा घेतल्यानंतर विसर्ग कमी करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी 5 हजार क्युसेसने सुरू असलेला विसर्ग कमी करीत 3 हजार क्युसेस इतका करण्यात आला होता.

दरम्यान, पावसाने दडी मारल्याचे पाहून पाटबंधारे विभागाने सोमवारी (दि.28) रोजी विसर्गात घट केली. धरणाचे अकरा दरवाजांमधून 1 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

पावसाने अशीच उघडीप ठेवल्यास विसर्ग बंद केला जाईल, अशी माहिती शाखाभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट व त्यानंतरचा विकेंडचा काळ हा पर्यटकांसाठी पर्वणीच असतो.

मुळा, भंडारदरा धरणाच्या भागात तोबा गर्दी होत असते. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आणि आनंद लुटण्याची संधी आणि आनंद पर्यटक घेत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24