अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस शेकडो लोकांमध्ये विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा वैज्ञानिकांनी केली आहे,या लसीच्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्टही सकारात्मक आला आहे,ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले की, त्यांच्या कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या 50 टक्के लस भारतातच पुरवल्या जातील, आणि उर्वरित इतर देशांना. पूनावाला म्हणाले की ही लस बहुधा सरकार खरेदी केली जाईल आणि लसीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील नागरिकांना मोफत मिळतील.
ही लस किती रुपयांना उपलब्ध असेल यासंदर्भात पूनावाला यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सध्या संपूर्ण जग करोनाचा सामना करत असल्याने लसीची किंमत कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल असं म्हटलं आहे. आज कोविड चाचणीचे सरासरी दर 2500 रुपये आहे.मात्र या लसीची किंमत एक हजार रुपये ठेवण्याचा विचार करीत आहोत. किंवा त्यापेक्षा कमी असेल,
पुढे बोलतना पूनावाला म्हणाले वाटत नाही की त्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे द्यावे लागतील कारण लस बहुधा सरकार खरेदी करतील आणि नंतर लसीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून मोफत वाटल्या जातील,भारत सरकारने पोलिओ, मलेरियासारख्या धोकादायक आजारांविरोधात कठोर पावले उचलत देशभरामध्ये लसीकरण मोहीम राबवली होती. याच कारणामुळे भारतामध्ये आता या आजारांनी ग्रासलेले अगदीच मोजके रुग्ण आढळून येतात.
दरम्यान या लसीच्या आतापर्यंतच्या चाचण्यांवरुन ही लस करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये खूपच प्रभावशाली ठरेल असं चित्र दिसत आहे. ऑक्सफर्ड व्हॅकसीन ग्रुपचे निर्देशक अॅण्ड्रू जे पोलार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार अॅण्टीबॉडी रिसपॉन्सवरुन ही लस प्रभावशाली असल्याचे दिसून आलं आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com