Panjabrao Dakh : सावधान ! 2 नोव्हेंबरला वातावरणात होणार मोठा बदल ; तयार होणार पावसाचे वातावरण, वाचा डख यांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh : राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. पावसाची उघडीप असल्याने शेती कामाला वेग आला आहे. दरम्यान पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.

मित्रांनो खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र समवेत संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण वाढले आहे. पंजाबरावांच्या मते, तापमान वाढीमुळे अलीकडे देशात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे यावर्षी पावसाळी काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे तसेच परतीचा पाऊस देखील नेहमीपेक्षा अधिक बरसला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या राज्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर असून रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान पंजाबराव ढक यांनी दोन नोव्हेंबर रोजी वातावरणात मोठा बदल होणार असल्याचे सांगितले आहे. पंजाबराव डख यांच्या मते, आता राज्यातुन मान्सून माघारी फिरला असून राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. दिवसा कडक ऊन पडणार असून रात्रीची थंडी देखील वाढणार आहे.

मात्र 2 नोव्हेंबर रोजी राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होणार आहे. 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र असे असले तरी राज्यात पाऊस पडणार नसल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

पंजाबराव डख केवळ हवामान अंदाज व्यक्त करतात असे नाही तर पंजाबराव एक प्रयोगशील शेतकरी म्हणून देखील ख्यातनाम आहेत. अशा परिस्थितीत पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना यावेळी गहू आणि हरभरा पेरणीसाठी शेतकरी बांधवांना सुरुवात करायला पाहिजे असा सल्ला दिला आहे.

पंजाबरावांच्या मते शेतकरी बांधवांनी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हरभरा पेरणी केल्यास त्यांना चांगला उतारा मिळू शकतो. निश्चितच याप्रमाणे वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात आता हवामान कोरडे राहणार असल्याने राज्यात रब्बी हंगामातील पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.