महाराष्ट्र

पंकजा मुंडेंना हरवणाऱ्या खा. बजरंग सोनवणेंच्या गाडीला जालन्यात अपघात

Published by
Ahmednagarlive24 Office

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल ऐतिहासिक ठरला. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत निकालामध्ये ट्विस्ट येत होता. अखेर या मतदारसंघात भाजपचे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. शरद पवार गटाचे खा. बजरंग सोनवणे हे विजयी झाले.

बीडमध्ये मराठा आरक्षणाचा व मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून आले. दरम्यान या निकालानंतर बजरंग सोनवणेंबाबत एक मोठं वृत्त आले आहे. त्यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याचे वृत्त आले आहे. हा अपघत रात्री झाला असून यात काहीजण जखमी झाले आहेत व त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती समजली आहे.

नेमके काय घडले ?
निकालानंतर रात्रीच बजरंग सोनवणे मनोज जरांगे पाटील यांच्या बिघाले होते. या भेटीला जात असतानाच त्यांच्या ताफ्यातील गाडीचं धडकल्याने अपघात झाला. हा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली होती परंतु सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

कसा झाला सोनवणेंच्या गाडीला अपघात?
या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, त्यांच्याच ताफ्यातील गाडी बजरंग सोनावणेंच्या गाडीला थकल्याने अपघात झाला व यात काही जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती समजली आहे. हा अपघात रात्री उशीरा जालना जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावर झालाय. मध्यरात्री ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला निघाले

असताना ताफ्यातील एक कारची बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडक बसली. किरकोळ अपघात असल्याने त्यांनी त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

जरांगे फॅक्टरचा फायदा
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला. मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील बहुतांश जागेवर महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. बजरंग सोनवणेंच्या विजयाला हे आंदोलन व जरांगे कारणीभूत असल्याची मोठी चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office