पारनेर :- लोकसभा निवडणुकीत सुपे गटात राष्ट्रवादीला आघाडी न मिळाल्यामुळे त्या पक्षाचा विधानसभेचा तथाकथित उमेदवार आकसापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडत असल्याचा आरोप युवा सेनेचे तालुका अधिकारी नितीन शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये कामाच्या ठेक्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत दोन्ही गटांत दोनदा संघर्ष झाला. या पार्श्वभूमीवर शेळके यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.