प्रलंबित कामांना प्राधान्य देऊन ते मार्गी लावण्याचे धोरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर – लोणी हवेली रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून सोळा लाखांचा निधी मिळाल्यामुळे या रस्त्यावरील वसाहतींमधील जनतेला दिलासा मिळाला आहे. या रस्त्यावर अनेक नव्या वसाहती झाल्या असून, रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त होते.

पावसाळयात नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत असे. रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी नगराध्यक्षा वर्षाताई नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरसेविका सुरेखा भालेकर यांनी जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, जि. प. सदस्या सुप्रिया झावरे यांच्या निधीमधून या रस्त्यासाठी जि. प. ने सोळा लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामास सुजित झावरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे अर्जुन भालेकर यांनी सांगितले.

यापूर्वी माजी आ. स्व. वसंतराव झावरे यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यांच्यानंतर या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आपणास संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे झावरे यांनी सांगितले.

झावरे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबदद्दल उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर, नंदकुमार देशमुख, योगेश मते, दीपक नाईक, दादा शेटे, बाळासाहेब मते आदींनी त्यांचे आभार मानले.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24