पारनेर सैनिक बँकेत लाखोंचा अपहार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे संस्थापक असलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप बँकेचे संचालक सुदाम गणपत कोथिंबिरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

कोथिंबिरे म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून बँकेच्या शिलकी रकमेतून ५,४५,७७२ रुपयांचा अपहार केला.

३० मे २०१९ रोजी मी व संचालक संतोष यादव, बापू अण्णा दरेकर यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयातील समरी बूकप्रमाणे शिल्लक रकमेची तपासणी केली असता ही रक्कम रोखपाल, वरिष्ठ अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवली नाही.

आम्ही १ जूनला पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ३ जूनला कोरडे व इतर चार अधिकाऱ्यांनी संगनमताने ५,६०,००० रुपये सॅलरी अडव्हान्स खात्यातून उचलून अपहार केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24