अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी जवळा येथे एका वृध्देच्या घरात जावून दमदाटी करत काठी उगारत मुलावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
या धमकीला घाबरल्याने पारनेर तालुक्यातील जवळे येथील हरणाबाई लक्ष्मण सालके या 65 वर्षीय महिलेचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सबंधित महिलेने रुग्णालयातून जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली असून तहसीलदार देवरे यांच्याकडून आपल्या कुटूंबास धोका असल्याचे त्यात नमुद करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे वनकुटे येथे तांदूळ व कडधान्ये बेवारस आढळून आल्यानंतर व्हायरल झालेल्या पोष्टवर संदीप सालके याने टिपन्नी केली होती.
त्याचा राग मनात धरून देवरे सालके यांच्या घरी जात तहसिलदार देवरे यांनी वृद्धेला धमकी दिली असे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
हरणाबाई यांना हृदयविकाराचा त्रास असून दिलेल्या धमकीमुळे त्या अस्वस्थ झाल्या. त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com