महाराष्ट्र

‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; १० दिवसात कोटींची कमाई

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे.

नुकतेच लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल एक ट्विट केले आहे.

यात त्यांनी मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवरच्या कमाईबद्दल पोस्ट शेअर केली आहे. “मराठी चित्रपट पावनखिंड हा हिट ठरला आहे.

दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. पहिला आठवडा – १२.१७ कोटी, आठवड्याच्या शेवटी – शुक्रवार १.०२ कोटी, शनिवार १.५५ कोटी, रविवार १.९७ कोटी…. एकूण – १६.७१ कोटी”, असे तरण आदर्श या पोस्टमध्ये म्हटले आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट :- या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.

Ahmednagarlive24 Office