अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : आमदार निलेश लंके यांच्या प्रेमात पवार कुटुंबीय पडले असुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शुक्रवारी पारनेर दौरा करून आ.निलेश लंके यांची राजकीय व सामाजिक काम करण्याची पध्दत त्यांनी समजावुन घेतली.
पार्थ पवार यांनी दि. 26 जून रोजी अचानक दुपारी पारनेरला येऊन आमदार लंके यांच्या घरी जेवण केले. तसेच त्यानंतर आ.लंके यांच्या हंगे या गावतील ग्रामदैवत हंगेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतले.
यावेळी आ.लंके यांची साधी राहणी तसेच साधे घर व घरातील कौटुंबिक प्रेमळ वातावरण पाहून व त्याचा प्रत्यक्षात अऩुभव घेऊन आश्चर्यचकीत झाले.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तरूणांचे मोठे संघटन उभे केले असुन याचा फायदा पक्षाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तसेच आ.लंके यांचे साधे राहणीमान
व समाजातील सर्व घटकांना सामावुन घेण्याचा स्वभाव हा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांच्या राजकारणाला समाजकारणाची जोड देणार्या विचारांचा आहे.
त्यामुळे आ. निलेश लंके यांच्या माध्यमातून दुसरे आर.आर आबा मिळाले असल्याची प्रतिक्रिया पारनेर दौऱ्यात पार्थ पवार यांनी दिली आहे.
दरम्यान पार्थ पवार हे दर महिन्याला पारनेरमध्ये येणार असून आमदार लंके यांची कार्यपद्धती जाणून घेणार आहेत. त्यांना अजित पवार यांनीच आमदार लंके हे कसे कामकाज करतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे,
त्यांनी कार्यकर्त्यांचे संघटन कसे उभे केले याचा अभ्यास करण्यासाठी पाठविले आहे. ते प्रत्येक महिन्याला वेळ मिळेल तसे पारनेरला येणार आहेत, असेही अॅड. राहुल झावरे म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews