कंडक्टरला आता रोख नव्हे ‘एटीएम’ने द्या पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : पूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांना कंडक्टर तिकिटे देताना त्या तिकिटांवर विशिष्ट पद्धतीने छिद्रे पाडून द्यायचे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरुवात झाली.

मात्र, आता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांकडे रोख रक्कम नसेल तरीही प्रवास करता येईल. एटीएम कार्ड आणि ऑनलाईन पदधतीने कंडक्टरला पैसे देऊन प्रवासाचे तिकीट घेता येईल. यासाठी परिवहन महामंडळाने ईटीआय हे मशीन आगारांना दिले आहेत. अशी माहिती संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली.

१४३ ईटीआय मशीन

परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवासाचे तिकीट घेण्यासाठी यूपीआय आणि एटीएमचा वापर करुन कंडक्टरला पैसे देता येणार आहे. याच मशीनद्वारे प्रवासाचे तिकीटदेखील दिले जाईल. संगमनेर आगाराला १४३ ईटीआय मशीन मिळाले आहेत. हे मशीन चार्ज करण्यासाठी संगमनेर बसस्थानकात विशिष्ट ठिकाणी सोय करण्यात येणार आहे.

वादाचे प्रकार टळतील

बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्टे पैसे ठेवावे लागायचे. सुट्टे पैसे नसले की, त्यावरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाददेखील व्हायचे. मात्र, आता यूपीआय आणि एटीएमचा वापर करुन कंडक्टरला पैसे देऊन प्रवासाचे तिकीट घेता येणार असल्याने बसमध्ये वादावादीचे प्रकार टळतील.

■ खेड्यांपासून ते बड्या शहरांपर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा पोहोचली आहे. परराज्यात देखील महामंडळाच्या बसेस जातात. साध्या बसेसनंतर आता अगदी वातानुकूलित बसेसही रस्त्यांवर धावतात. संगमनेर आगारातील बसेसच्या वाहकांकडे ईटीआय मशीन दिले जाणार आहेत. त्याचे प्रात्यक्षिक सुरु असून काही दिवसांतच प्रवाशांसाठी ही सेवा सुरु होईल. -प्रशांत गुंड, आगारप्रमुख संगमनेर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ