महाराष्ट्र

लोक माझ्या कपड्यांवर टीका करतात, पण आम्ही हनुमानाचे भक्त ! अरविंद केजरीवाल यांनी काय दिले संकेत?

Published by
Ahmednagarlive24 Office

नवी दिल्ली : ५ राज्यांच्या निवडणुकींचे निकाल लागले आहेत, यातल्या ४ राज्यांमध्ये भाजपला (Bjp) निर्विवाद यश मिळाले आहे, तर पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाचा झाडू चालला आहे.

या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत आनंद व्यक्त केला आहे. तसेच यापुढे आम आदमी पार्टी संपूर्ण देशात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, अरविंज केजरीवाल म्हणाले की कॅप्टनसाहेब हरले, चन्नीही हरले, नवज्योतसिंह सिद्धू हरले. हा आम आदमी पार्टीसाठी मोठा विजय आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं. केजरीवाल दहशतवादी असल्याचं म्हटलं गेलं. मात्र या निकालातून जनतेनं सांगितलं की केजरीवाल दहशतवादी नाही तर या देशाचा खरा पुत्र आहे, अशा शब्दात केजरीवाल यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी लोकांना आम आदमी पार्टीत प्रवेश करा असे सांगितले आहे. पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी महिला, युवक, शेतकरी, गरीब जनता अशा सर्वांना आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केले आहे.

यासोबतच ते म्हणाले, माझे लहान बंधू भगवंत मान यांना पंजाबचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. संपूर्ण निकाल अजून बाकी आहे. इतकं मोठं बहुमत. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही, असं केजरीवाल म्हणाले.

त्याचबरोबर माझ्या कपड्यांवर टीका झाली. माझ्या रंगाबाबत बोललं गेलं. पण आम्ही द्वेषाचं नाही तर सेवेचं राजकारण करु. त्यासाठी मी हनुमानाचा आशीर्वाद घेतला आहे, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office