नेत्यांच्या गर्विष्ठ बोलण्यामुळे लोक भाजपा पासून दूर जातील – एकनाथ खडसे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ज्या खान्देशात भाजपा रुजवली आणि वाढवली त्याच खान्देशातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करू असे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना आपले मत व्यक्त केले.

प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन खान्देशात कमळ फुलवले आणि तथ्यहीन कारणे पुढे करून मला संपविण्याचा कुटील डाव भाजपातील नेता करीत असेल तर

अजून किती सहन करावे यामुळेच मी भाजपा ला राम राम ठोकला व उत्तर महाराष्ट्राचा अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी ची वाट धरली असे नाथाभाऊंनी शिरपूर येथील सभेत उदगार काढलेत.

महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडा असे सर्व भागातील मुख्यमंत्री झालेत परंतु नेहमी उत्तर महाराष्ट्राला दुय्यम स्थान मिळाले जेंव्हा उत्तर महाराष्ट्राला संधी मिळणार असे वाटले तेंव्हाच नाथाभाऊवर चुकीचे आरोप करून बाजूला केले हे एक षडयंत्र होते परंतु यापुढे अन्याय सहन करणार नाही

तर याच भाजपा विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार व प्रसार करून विकास साधू . आगामी काळात भारतीय जनता पक्ष्यांच्या नेत्यांना कळेल की नाथाभाऊ काय होते. भाजपचे संकट मोचन म्हटले जाणारे जळगांव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली की

मुख्यमंत्री च्या शर्यतीत असणारे किती तरी लोक भाजपा सोडुन गेले त्यामुळे काही फरक पडत नाही यावर नाथाभाऊंनी प्रतिक्रिया देताना म्हटले की भाजपचे नेते जी गर्विष्ठ भाषा वापरतात त्यामुळे कार्यकर्ते दुरावतील आगामी काळात कळेल की भाजपचे काय नुकसान होते ते.

सभेत धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी खळबळजनक वक्तव्य केले की डिसेंबर पर्यंत माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचाराचे एक प्रकरण बाहेर काढीत असून लवकरच याबाबत माहिती देऊ असे वक्तव्य केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24