जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडायला हवे : खा.डॉ.सुजय विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोना रोगाच्या काळजीसाठी गर्दी जमवु नये व सरकारी नियमांचे पालन केले पाहीजे. परंतु जनतेत फिरलेच पाहीजे जनतेचे इतरही प्रश्न समजावुन घेवुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडले पाहीजे.

पिण्याचे पाणी, शेतीमालाला भाव, शेतीचेपाणी, मालवाहतुक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी लोकामधे जावे लागेल.

मी गेल्या महीनाभरापासुन रोज फिरतोय आणि साठ हजार कुटुंबाला मोफत किराणा वाटपाचे काम केले आहे. आणखीही काम करावयाचे आहे. लोकांच्या सोबत असणं महत्वाचे असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

शहरातील कसबा विभागातील गरजु कुटुंबांना मोफत किराणा वाटप करुन आल्यानंतर येथील शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, कोरोना रोगाच्या विषयावर कुण्या एका जातीला दोष देवुन चालणार नाही. हा राजकारणाचा विषय नाही.

संकटात राजकारण बाजुला ठेवले पाहीजे. ज्यांच्या -त्यांच्या तालुक्यातील लोकप्रतिनिर्धींनी घराबाहेर पडले पाहीजे. गावागावात जाऊन तेथील प्रश्न समजावुन घेतले पाहीजेत. ग्रामीण भागातील जनतेने बंद पाळल्याने कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला मदत झाली.

आपण सध्या आरेंज झोनमधे अहोत, लवकरच ग्रीन झोनमधे येवु. उद्योग व व्यवसायाला काही सवलती मिळतील. केंद्र सरकारने धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकार त्यामधे काही अटीशर्ती घालुन त्याची अमंलबजावणी करील.

माणसाकडे माणुसकीच्या भावनेतुन राहीले पाहीजे आणि मी तर जनता जनार्दनाची सेवा करण्याचे व्रत जपतो आहे. लॉकडाऊन संपण्याची वाट पाहु आणि स्वच्छता राखुन कोरोनाला हरवु.

यावेळी अभय आव्हाड, अजय रक्ताटे, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, प्रविण राजगुरु, रमेश गोरे उपस्थी होते. अजय रक्ताटे यांनी आभार मानले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24