अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-एकीकडे महाराष्ट्र राज्यात गोमांस हत्या प्रकरणावरून अनेक सामाजिक संघटना आक्रमक भूमिका घेत आहे. जनावरांचे रक्षण व्हावे या उद्देशाने कठोर कारवाई केली जात आहे.
त्यातच शेजारील राज्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाताळ सणाला अवघे दोन दिवस बाकी असतानाही अजूनही राज्यात बीफ मिळत नसल्याने खाद्यप्रेमींची निराशा झाली आहे.
शेजारील कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी विधेयकामुळे गोव्यात बीफचा तुटवडा जाणवत आहे. बीफ विक्रेत्यांनी राज्यातील एकमेव गोवा मांस प्रकल्प खुला करण्याची मागणी केली होती.
याविषयी विचारणा केली असता मुख्यमंत्री म्हणाले, की शेजारील राज्यातून गोव्यात बीफ आयात करण्यासाठी राज्य सरकारने काही एजंटांना परवाना दिला होता.
आता नाताळ मध्ये राज्यात बीफचा तुटवडा कमी पडू नये यासाठी सरकार दरबारी अधिकृत नोंदणी असलेल्या बीफ एजंटांनाच महत्वाची भूमिका बजवावी लागेल.
राज्यात बीफ कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर जिवंत प्राणी राज्यात आणून ते फक्त गोमास प्रकल्पातच कत्तल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकार आवश्यक ते सर्व सहाय्य करणार आहे.