अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे.
सरकारी कंपन्यांनी तेलाचे भाव वाढवल्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव २८ आणि ३० पैशांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव ५० डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तसेच गेल्या महिन्यातही कच्चा तेलाचे दर वाढले होते.
कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्याने महाराष्ट्राला मोटा फटका बसला आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव २७ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुंबईसह विविध भागात पेट्रोल ९०.०५ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेलचे भाव ३० पैशांनी वाढला असल्यामुळे ८०.२३ रुपये प्रति लिटर झाले आहे.