महाराष्ट्र

PhonePe Offer : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जबरदस्त ऑफर! आता PhonePe वरून खरेदी करा सोने; होईल मोठा फायदा

PhonePe Offer : महाराष्ट्रातील लोक शुभ मुहूर्त पाहून सोने तसेच इतर मौल्यवान वस्तू खरेदी करत असतात. उद्या अक्षय्य तृतीया हा सण असून उद्या देखील लोक मोठ्या प्रमाणात दागदागिने खरेदी करतात.

जर तुम्हीही उद्या या मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने सुद्धा अक्षय्य तृतीयेच्या खास शुभ मुहूर्तावर अ‍ॅप च्या माध्यमातून सोने खरेदीवर कॅशबॅक ऑफरची घोषणा जाहीर केली आहे.

PhonePe कंपनीने गुरुवारी सकाळी निवेदन जारी करत असे म्हटले आहे की 22 एप्रिल 2023 रोजी 1 ग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक सोन्याच्या खरेदीवर 50 रुपये ते 500 रुपये पर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.

फोन पे चे वापरकर्ते अ‍ॅप च्या माध्यमातून सर्वात जास्त शुद्धता असलेले 24K सोने खरेदी करू शकणार आहेत. हे सोनं ग्राहक बँक ग्रेड विमा लॉकर ला जमा करु शकतील. यामध्ये दागिने घडविण्याच्या चार्ज लागणार नाही. आपण जमा केलेलं सोन्याची कोणत्याही वेळी विक्री केल्या वर 48 तासांच्या आत आपल्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.

PhonePe वरून सोनं कसं खरेदी करायंचं ?

आपल्या PhonePe एप्लिकेशन्स च्या होम स्क्रीनच्या खाली असलेल्या Wealth ऑप्शन वर क्लिक करा

-Investment Ideas या पर्याय वरून Gold या ऑप्शन वर क्लिक करा

Buy One Time हा पर्याय निवडा

-आपण आपल्याला हवी तेवढी रक्कम अथवा ग्रॅम टाकू शकता. परंतु, ऑफर मधून आपल्याला कॅशबॅक मिळविण्यासाठी, किमान 1 ग्रॅम सोन्याची खरेदी करावे लागेल.

यानंतर Proceed या ऑप्शन वर क्लिक करा (टीप- आपण स्क्रीन वर पहात असलेली सोन्याची किंमत फक्त 5 मिनिटां करीता मान्य आहे त्यांनतर आपोआप किंमत रिफ्रेश होईल)

– त्यांनतर Proceed to Pay ऑप्शन वर क्लिक करा त्याचबरोबर पसंतीचे पेमेंट पद्धत निवडा आणि पेमेंट पूर्ण करा.

– आपण खरेदी केलेलं सोनं हे बँक-ग्रेड लॉकरमध्ये जमा करण्यात येईल. आपण डिलिव्हरी करीता विनंती करू शकता.अशा प्रकारे तुम्ही सोने खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts