Pik Vima Yojna : राज्यसरकारने यंदा १ रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.दरवर्षी पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नसे.
जास्तीत जास्त शेतकयांनी पीक विमा काढावा यासाठी सरकारने यावर्षीपासून एक रूपयात पीक विमा योजनेची घोषणी केली. त्यानुसार अगदी गावनिहाय अंमलबजावणीही केली. उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे यंदा एक रुपयात पीक विमा काढण्याकडे शेतकन्यांचा ओढा होता.
जिल्ह्यात सरासरी दोन ते अडीच लाख शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा घेत असे. यंदा मात्र तब्बल पावणे बारा लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विम्याचे कवच घेतले आहे. त्यातून पावणे सात लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. राज्य शासनाच्या एक रूपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पारनेरला सर्वाधिक, श्रीरामपूरला सर्वांत कमी प्रतिसाद
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा योजना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील १ लाख ४५ हजार शेतकन्यांनी पीक विमा घेतला. यातून ६९ हजार ८२७ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले.
यापाठोपाठ पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वात कमी प्रतिसाद श्रीरामपूर तालुक्यात मिळाला. येथील ३१ हजार शेतकयांनी विमा घेतला. त्या पाठोपाठ राहाता, कोपरगाव तालुक्यात काहीसा कमी प्रतिसाद मिळाला.
सर्वाधिक विमा सोयाबीनचा
जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी सर्वाधिक विमा सोयाबीनचा उतरविला आहे. ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा घेतला. त्यामुळे २ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांनी कपाशीचा विमा उतरविला आहे. २ लाख ४९ हजार शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला.
कोणत्या तालुक्यात किती शेतकऱ्यांनी काढला विमा?
तालुका विमा काढलेले शेतकरी
अकोले ५६२१२
जामखेड ९४५२७
कर्जत ११६२५७
कोपरगाव ५२४४९
नगर ८०५०८
नेवासा ९०३८९
पारनेर १४५१२४
पाथर्डी १२६२८५
राहाता ४६८२५
राहुरी ५४०४२
संगमनेर ८३६५५
शेवगाव ९२०१३
श्रीगोंदा १०३८६१
श्रीरामपूर ३१६००