अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- बोल्हेगाव नागापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. परंतु नागरिकांचे विविध प्रश्न प्रलबिंत आहे.
गणेशचौक ते बोल्हेगाव पर्यंत जाणाऱ्या रत्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करीत असातांना आपला जीव मुठीत धरून करावा लागतो. या रस्त्यावर दिवसभर अनेक छोटेमोठे अपघात होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
तरी तातपुरत्या स्वरूपात या रस्त्यावरील खड्यांचे पॅचींग करावे व नंतर या रस्त्याचे डाबरीकरण करावे दिवाळी सण हा जवळ आला आसून नागरिकांना विविध संमस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तरी महापालिकेने बोल्हेगाव ते गणेश चौकापर्यंत रस्त्यांचे काम तातडीने हाती घ्यावे तसेच सावेडी उपनगरातीलही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम जलद गतीने करावे अशी मागणी नगर सेवक कुमारसिंह वाकळे व विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकवार यांच्याकडे केले.
यावेळी नगर सेवक अविनाश घुले, सांरग पंथाडे, शहर अभियांता सुरेश इथापे, इजि. परिमल निकम आदी उपस्थित होते. कुमारसिंह वाकळे म्हणाले की गेल्याअनेक वर्षापासून या परिसराचा विकास रखडला होता परंतु गेल्या सहा वर्षापासून नागरिकांच्या मुलभुत प्रशश््नापासून विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे.
महापालिकेच्या आर्थिक परिस्थिती बिकट असतांना ही प्रभागाच्या विविध प्रश्नासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्यामुळे रहदारीचे प्रमाणही वाढले आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे गणेश चौक ते बोल्हेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दिवाळी पूर्वी हे खड्डे बुजवावे व संपूर्ण रस्त्याचे डाबरीकरण करावे अशी मागणी यावेळी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved