राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अखेर आज संपला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला आहे.
शनिवारी सकाळी हा शुपथविधी सोहळा राजभवनात पार पडला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांनाही पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दोघंही मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील याचा मला विश्वास आहे, अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देत, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील, असा विश्वास असल्यास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.