अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी ते देशाला संबोधित करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना धीर देतानाच करोनासाठी देश पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी देखील माहिती दिली.
लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न :- भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त
क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले”, असं म्हणत मोदींनी देशातील संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं कौतुक केलं.
फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक :- “सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही करोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं होतं.
आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल”, असं मोदी यावेळी म्हणाले.
प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा :- देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे.
सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत”, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
देश पुढे जात आहे :- आपल्या शास्त्रात म्हटलंय, कठीण पेक्षाही कठीण काळात आपल्याला धैर्य सोडायला नको, असं म्हटलं आहे.
कोणत्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतला तरच आपण यश प्राप्त करु शकतो. याच मंत्राला फॉलो करत देश पुढे जात आहे. कोरोना संकटात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
हे संकट विश्वासाने पार करायचं :- संकट मोठं आहे, पण आपल्याला हे संकट विश्वासाने पार करायचं आहे. सर्व डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर,
सुरक्षा रक्षक या सर्वांनी आपलं आयुष्य पणाला लावून जीव वाचवले. या लाटेतही त्यांनी आपली चिंचा, आपलं कुटुंब सोडून सेवा सुरुच ठेवली आहे.
एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत :- पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. जे तुम्ही सोसत आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या लोकांनी आपल्या माणसाला गमावलं
त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. परिवाराचा एक सदस्य म्हणून मी तुमच्यासोबत आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
लसीकरण मोहीमही हाती :- सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत असून सरकारकडूनही यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
तसंच आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार :- १ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात :- करोनाचे रुग्ण वाढताच देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे.
आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे.