या तालुक्यात विषारी नागांचा वावर वाढला; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  सध्या जिल्ह्यात बिबट्याने दहशत घातली आहे.अनेकांवर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ठार केले. आधीच बिबट्याच्या दहशतीने धास्तावलेले गावकरी आता विषारी सर्प व नागांच्या वाढत्या वावरामुळे चिंताग्रस्त आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून बिबट्या पाठोपाठ विषारी नागासह इतर विषारी संर्प व हिस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे.

आश्वी खुर्द येथिल डॉक्टर प्रणव गुणे यांच्या घरी दोन दिवसापूर्वी ब्लँक कोब्रा हा विषारी नाग आढळून आला. या कुटुंबाने तातडीने सर्पमित्राच्या साहायाने या नागाला बंदीस्तं करून लांब निसर्गात मुक्त केले.

दैनंदिन परिसरातील वेगवेगळ्या गावानमध्ये लहान मोठ्या नागान बरोबरचं इतर विषारी संर्प आढळून येत असून यामुळे आद्याप कोणतीही मोठी दुर्घटना झाली नसली तरी

या विषारी प्राण्याच्या दर्शनाने धडकी भरत असल्याने नागरीक दहशतीखाली वावरत आहेत. दरम्यान आश्वी सह पंचक्रोशीत मागील काही वर्षामध्ये बिबट्याची संख्या वाढल्यामुळे

या बिबट्यानी मोठ्या प्रमाणावर मोर व मुगंसाची शिकार केली. संर्प हे मोर व मुगंसाचे खाद्य असून या प्राण्याची संख्या घटल्याने सापाची संख्या वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24