अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील टोलनाक्याजवळ दोन मालट्रक चालकांची लूट आणि एकाचा खून करणाऱ्या आठ आरोपीना लोणी पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले.
कोल्हार येथे वेगवेगळ्या भागात दडून बसलेल्या आरोपींचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. हे दरोडेखोर अहमदनगर जिल्ह्यात रस्तालूट करत होते,
दोन दिवसांपूर्वी राहाता तालुक्यात एका ट्रकड्रायव्हरची गळा चिरून हत्या केली होती हत्या आणी लूट करणारे आठ आरोपी पोलीसांनी केले जेरबंद केले असून हे सर्व आरोपी 25 ते 30 वयोगटातील आहेत.
अनेक दिवसापासून रस्तालूट करत असल्याच सिद्ध लोणी परीसरातून आरोपींना घेतले ताब्यात आहे.पोलीसांच्या ह्या धडाकेबाज कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे. आरोपी जेरबंद झाल्याने भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved