डिझेल भेसळ प्रकरणात पोलिसांकडून एका आरोपीस अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते.पोलिसांनी काल रात्री आणखी एका आरोपीला याप्रकरणात अटक केली आहे.

तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने नगर शहरातील जीपीओ चौकातील छावणी मंडळाच्या जागेत छापा टाकत डिझेल भेसळ उजेडात आणली होती.

छाप्यात सुमारे 2 हजार लिटर डिझेल जप्त करत गौतम बेळगे या आरोपीला अटक केली. अटकेतील बेळगे याच्या माहिती आधारे पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

अटकेतील या आरोपीकडून बेळगेने टँकर विकत घेत त्यात बदल केले होते. हे बदल कोणाच्या आदेशाने केले, त्याला परवानगी होती का? तसेच राहुरीच्या ‘त्या’ पेट्रोलपंपाचाही शोध घेतला जात आहे.

भिंगारचे एपीआय प्रवीण पाटील यांच्याकडून तपास काढून तो नगर शहराचे डीवायएसपी विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला आहे.

ढुमे यांनी एकाच दिवसांत तपासाला गती देत आणखी एका आरोपीला अटक केली. नव्याने अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना भेसळ रॅकेटची चेन मिळते का? याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24