अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-भारतात क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यातच आयपीएल म्हणजे एखादा सण असल्यासारखाच वाटतो. मात्र मनोरंजनासाठी असलेल्या या खेळाचा वापर काही जणांकडून अवैध मार्गाने आर्थिक चलन मिळवण्यासाठी केला जातो आहे.
यातच आयपीएल मध्ये सट्टा लावणाऱ्या दोघांना नेवासा मध्ये पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, एक कार नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासेफाटा येथे वेगवेगळ्या पॉईंटवर थांबवून
आयपीलएल नावाचा सट्टा खेळवला जात असल्याची माहिती नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस अधीक्षक अभिनय त्यागी यांना खबऱ्याकडून समजली.
पोलिस पथकाने तातडीने सापळा रचून सट्टा चालवणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बोरुडे, संतोष रंगनाथ गुंजाळ यांना नेवासेफाटा येथील गुरुदत्त हॉटेलसमोर अटक केली.
त्यांच्याकडील हुंदाई कार, ६ मोबाइल, सट्ट्याचे साहित्य व रोख रक्कम ३४ हजार ७०० असा मिळून एकूण तब्बल १२ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन पंटरांना अटक केल्यानंतर यांनी मुंबई – दिल्ली अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर कोड लँग्वेजमध्ये आकडे घेऊन बुकी किरण पोपट जाधव याला शोधण्याचा प्रयत्न केला.
पोलिस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले, पण तो सापडला नाही. काॅन्स्टेबल रवि गोविंद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार ठोंबरे पुढील तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved