अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलेल्या राहुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
तालुक्यातील कणगर हद्दीत ओढ्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाला एका अनोळखी इसमाने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रामचंद्र भाऊ नरोडे (रा. चिंचविहिरे) यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला पस्तीस वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी दुपारच्या सुमारास जनावरांना गवत आणण्यासाठी गेलेले योगेश प्रकाश नरोडे (रा. चिंचविहिरे) यांनी घटनास्थळी आत्महत्येचा प्रकार पाहिला.
ही घटना सोमवारी घडली असून घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु, मृत इसमाचा गळफास काढला नाही. आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजेपर्यंत प्रेत झाडाला लटकलेले होते.
पोलीस प्रशासनाने अथक प्रयत्नाने अखेरीस हा मृतदेह खाली उतरवला. गळफास घेऊन आत्महत्या केलेला इसम अनोळखी आहे.
चार दिवसांपूर्वी गळफास घेतला असावा. मृतदेह कुजलेला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून, मूठमाती दिली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved