मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघांना घेतले ताब्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. मटका, जुगार, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री अशा घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत छापा सत्र सुरूच ठेवले आहे.

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी छापे टाकले. व पाच जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदा कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती अप्पर अधीक्षक डॉ. राठोड यांना मिळाली होती.

मिळालेल्या महिती नुसार त्यांनी विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले. पहिला छापा; एक फरार दोघांना घेतले ताब्यात पथकाने सुरूवातील बोल्हेगावातील आंबेडकर चौकात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला.

याठिकाणी सुभाष वामन थोरात  त्यांच्याकडून 11 हजार 270 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली. तर बजरंग मामा (पूर्ण नाव माहिती नाही) हा पसार झाला. दुसरा छापा; एक फरार एक ताब्यात पथकाने दुसरा छापा सह्याद्री चौकात टाकला.

नदिम इब्राहिम शेख (वय- 35 रा. सह्यादी चौक, एमआयडीसी) हा जुगार खेळताना मिळून आला पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून 1 हजार 420 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर निलेश भाकरे हा पसार झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24