वाळूतस्करांवर पोलिसांचा छापा.. या तालुक्यात घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यात वाळूतस्करीचा अवैध धंदा सध्या जोरात सुरु आहे. यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आरामक पावले उचलली आहे.

नुकतीच श्रोगोंदा तालुक्यातील वाळू तस्कराची कारवाईची हगतना ताजी असतानाच, आज संगमनेर तालुक्यातही वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आलाय आहे.

तालुक्यातील उंबरी शिवारातील प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मात्र, उपसा करणारे वाळूतस्कर पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पोलिसांना गुप्त माहिती समजली कि, उंबरी परिसरातील प्रवरा नदीपात्रात आवडीच वाळू उपसा सुरु आहे.

पोलीस पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पांढर्‍या रंगाच्या झेनॉन वाहनामध्ये वाळू भरत असताना आढळून आले. मात्र, अंधार असल्याने वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणी पोलीस नाईक अडबल यांनी आश्वी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वाळूतस्कर अशोक शेळके (रा.उंबरी) आणि गणेश साहेबराव मदने (रा.आश्वी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर यातील 2 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीची झेनॉन पिकअप (क्र.एमएच.14, व्ही.9424), 5 हजार रुपये किंमतीची अर्धाब्रास वाळू.

तसेच 2 लाख रुपयांच्या दुसर्‍या विनाक्रमांकाच्या झेनॉन पिकअपमधील 5 हजार रुपये किंमतीची अर्धाब्रास वाळू असा एकूण 4 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास आश्वी पोलीस करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24