महाराष्ट्रात राजकीय भूकंप : पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत मोठा धक्का देत भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे. आज (23 नोव्हेंबर) सकाळी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली

मुंबईतील राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, “शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.

सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी महाविकासआघाडीकडून सातत्यानं बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळं ठरत असताना मात्र अचानक राजकीय भूकंप आला आणि थेट राजभवनात मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला.

महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्यानं अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळं समीकरण समोर आलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24