अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई :- मध्य प्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करुन मोठा निर्णय घेतला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मध्य प्रदेशात सत्तांतर निश्चित होणार असून काँग्रेस सरकार जाऊन भाजपचे सरकार तेथे स्थापन होणार आहे.
दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात केला तसा राजकीय भूकंप महाराष्ट्रात लवकरच होईल, असा दावाही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
उमेदवारी दिल्याबद्दल आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा यांचे आभार मानले. कोरोना व्हायरस विरोधात भारत सरकार आणि राज्य सरकार देखील नियंत्रण यासाठी प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं.
मी कोरोना गो असं म्हटलं होतं. आता राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला ‘गो’ म्हणून सांगितलं पाहिजे असंही ते म्हणाले.मध्यप्रदेशात सत्तेचा जो ‘व्हायरस’ आला आहे तो व्हायरस आता महाराष्ट्रातही येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या आधीही आठवले यांनी महाराष्ट्रात सत्ताबदल होणार असल्याचं म्हटलं होतं. महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा नेता संपर्कात असल्याचा खुलासाही त्यांनी केला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com