शरद पवारांचा विखे पाटलांना ‘धक्का’ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील महासंचालक व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी डॉ. निमसे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यानंतर निमसे यांनीही यासाठी तयारी दर्शविली होती.

शिक्षण क्षेत्रातील गाढा अनुभव असलेला डॉ. निमसे यांनी प्राचार्य, दोन विद्यापीठांचे कुलगुरू अशी पदेही भूषविली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते विखेंच्या संस्थेत महासंचालकपदावर कार्यरत होते.

डॉ. विखे पूर्वीपासूनच या मतदारसंघात तयारी करीत आहेत.कॉंग्रेसकडून तिकीट मिळाले तर पक्षाकडून अन्यक्षा अपक्ष, अशी विखेंची भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नसून राष्ट्रवादीकडून आता डॉ. निमसे यांचे नावेही पुढे करण्यात आले आहे. डॉ. निमसे यांनीही तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी जामखेड तालुक्यात बैठकाही घेतल्या.

तयारीच्या दृष्टीने अडचण नको, म्हणून डॉ. निमसे यांनी विखेंच्या संस्थेचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रीय होण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

विखे पाटील यांच्याच संस्थेतील व्यक्तीला ‘फोडून’ विखे पाटलांच्या विरोधात उभे करण्याचा ‘धक्का’ शरद पवारांनी विखे पाटील कुटुंबीयांना दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24