विखे-कर्डीले यांच्यामधील मैत्री संपुष्टात येणार ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा भाजपाचे तिकीट खासदार दिलीप गांधी यांना निश्‍चित झालेले आहे.

मोठा मतदार संघ असल्याने त्यांचा संपर्क कमी असला तरीही आम्ही बाकी आमदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार असल्याचे वक्तव्य आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

मोमीन आखाडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी गावातील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सूर्यभान शिंदे होते.

यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधी राष्ट्रवादी पक्षाच्या परिवर्तन यात्रेवर जोरदार हल्ला चढविला.

दरम्यान आमदार कर्डिले यांच्या विधानामुळे डॉ. सुजय विखे यांना धक्का बसला आहे. विखे-कर्डीले यांच्यामधील मैत्री आगामी लोकसभेच्या निवडणुकीत संपुष्टात येणार का? अशी चर्चा होऊ लागलेली आहे.

राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार यांना कारखानदार, पैसे असणारे नेते आपल्या पक्षात चालतात.

मी सर्वसामान्य असल्यानेच राष्ट्रवादी मला संपविण्यासाठी प्रयत्न करीत असून सर्वसामान्यांच्या जीवावर विरोधकांचे मनसुबे आपण उधळून लावू, असेही आमदार कर्डिले यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24